राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . राज्यात आतापर्यंत 16758 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य प्रशासन आपापल्यापरीने सर्वतोपरी मेहनत करताना दिसून येत आहेत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहेत सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे देशासह महाराष्ट्रातही कोरोना पसरत चालला आहे मात्र सरकार योग्य ती पावले उचलून प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत .
मुंबईमध्ये आतापर्यंत तब्बल 10714जणांना कोरोनाची बाधा झाली आहे यापैकी 426 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 412 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. प्रशासन या बाबतीत सतर्क झाले असून नागरिकांना घरातच राहण्याचे व घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे