सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे परतूर तालुक्यातील जनतेने देखील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केले आहे. जीवनावश्यक आणि नित्य उपयोगी वस्तू पूरग्रस्तांसाठी पाठवल्या आहेत.
सदर मदतीमध्ये कपडे,अंथरून,पांघरून,किराणा माल,रेडिमेड आटा, खाद्य तेल,खाद्यपदार्थ, तांदूळ, स्वच्छतेची साधने,भांडे,मेडिकल औषधी व अश्या इतर जीवनाश्यक वस्तूंचा समावेश आहे. या मदतीच्या आज कोल्हापूर सांगली कडे रवाना करण्यात आला आहे. या मदत कार्यात मनोहर खालापुरे,रामेश्वर अण्णा नळगे,परेश पाटील,महेश होलाणी,सुनील कासट, भाऊसाहेब मुके आदी ग्रामस्तांनी मदत केली आहे.
दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.