पुणे : शहरात पुराचा फटका बसलेल्या 2 हजार कुटुंबांना प्रत्येकी 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी दिली. पूरग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मदत पोहोचवण्यात येणार आहे.
जोरदार पावसामुळे वरसगांव, पानशेत, टेमघर अणि खडकवासला ही धरणे भरल्याने मुठा नदीत विसर्ग करण्यात आला. तसेच मुळशी आणि पवनातून मुळा नदीत पाणी सोडल्याने मुळा-मुठा नदीच्या आजूबाजूच्या भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. त्याचा फटका नदीकाठच्या भागात असलेल्या कुटुंबांना बसला होता.
या कुटुंबाना महापालिकेच्या शाळांत स्थलांतरित केले गेले होते. पुरामुळे अनेक घरांचे आणि आतील सामान, वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्या सर्व कुटुंबांना मदत देण्यासंदर्भात महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली.