आगामी ‘लाल सिंह चड्ढा’च्या माध्यमातून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक सिनेरसिकांचे एक स्वप्न सत्यात उतरणार आहे. बॉलिवूडचे तिन्ही खान या चित्रपटात सोबत झळकणार आहेत. अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान आमिरच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

याबाबत रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात शाहरुख खानसाठी एक स्पेशल रोल आमिरने ठेवला आहे. हो कुठला कॅमियो रोल नसून एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे, चित्रपटासाठी जी अत्यंत महत्त्वाची ठरेल. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त आमिर सलमान खानलाही घेण्याच्या विचारात आहे. आपल्या या चित्रपटात तिन्ही खान एकत्र दाखवण्याची आमिर खानची इच्छा असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

आमिरने सलमान खानसाठीही एक महत्त्वाची भूमिका राखून ठेवली आहे. त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील भूमिकेबाबत शाहरुखने सांगितले आहे. पण या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी अद्याप सलमान खानने होकार दिलेला नाही.

अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘सीक्रेट सुपरस्टार’चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून केली जात आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपटा 2020 मध्ये ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.                                    


Find out more: