2019 हे वर्ष संपायला आता मोजकेच दिवस राहिले आहेत. या वर्षात बॉलिवूड, हॉलिवूडचे अनेक चित्रपट हीट ठरले. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला आणि प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र या सर्वात सर्वाधिक चर्चा झालेला चित्रपट ठरला तो म्हणजे हॉलिवूडचा ‘जोकर’. अभिनेता जोक्विन फिनिक्सने साकारलेली अर्थूर फ्लेक ही भूमिका सर्वांनाच भावून गेली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर कमाई केलीच, मात्र दिग्दर्शक टॉड फिलिप्स यांच्या व्हिजनचे देखील समिक्षकांकडून कौतूक झाले.

 

‘जोकर’ हा या वर्षातील सर्वाधिक रेटिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला ‘आयएमडीबी’ या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक 8.6 रेटिंग मिळाली आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच आपल्या अभिनयासाठी जॉक्विन फिनिक्सला ‘सर्वोत्तम अभिनेता’ या कॅटिगरीमध्ये गोल्डन ग्लोब्स पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. या चित्रपटाला या वर्षी अनेक पुरस्कार मिळतील यात कोणती शंकाच नाही.

 

एवढेच नाही तर ‘आर’ रेटिंग असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1 बिलियन डॉलर पेक्षा अधिक कमाई केली आहे. ‘आर’ रेटेड चित्रपटाने केलेली ही पहिलीच कामगिरी आहे. जोकरने या वर्षी प्रदर्शित झालेल्या द आयरिशमॅन, नाईव्हस आउट, मॅरेज स्टोरी आणि एव्हेंजर्स : एंडगेम या सर्व चित्रपटाने मागे टाकले.                                                           

 

Find out more: