जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘छपाक’ चित्रपटात मालतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या जाणाऱ्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. दीपिकाचे Skill India Promo संबंधित असलेले सर्व व्हिडिओ सरकारकडून थांबवण्यात आले आहेत. दीपिकासोबत असे सरकारविरोधी पाऊल उचलल्यामुळे घडले का? असा सवाल या निमित्ताने उभा राहिला आहे.
दीपिकाचे सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालय Skill Development Ministry कडून प्रमोशनल व्हिडिओ काढण्यात आले आहेत. दीपिका या व्हिडिओत अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांबद्दल आणि कौशल्य विकासाबद्दल माहिती देणार होती. या व्हिडिओत काही अॅसिड पीडित तरूणींचा देखील समावेश होता. दीपिकाच्या हस्ते बुधवारी कौशल्य विकासाचा हा व्हिडिओ रिलीज करण्यात येणार होता. हा व्हिडिओ श्रम शक्ती भवनामार्फत दाखवण्यात येणार होता. पण दीपिकाचा हा व्हिडिओ मंगळवारी थांबवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दीपिका 45 सेकंदाच्या या व्हिडिओत शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘छपाक’ चित्रपटाबद्दल आणि इतर भारत कौशल्य विकासाबद्दल बोलणार होती. मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अॅसिड पीडित तरूणींवर झालेल्या हल्ल्यावर आधारित छपाक चित्रपटामध्ये दीपिकाने भूमिका साकारली आहे. याकरिता ती पीडित तरूणींना आणि दिव्यांग व्यक्तींना भेटली होती. या सगळ्यांना स्किल इंडियातर्फे मदत देण्यात आली होती.
दीपिकाला जुएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे चांगलेच महागात पडले आहे. तर काहींनी दीपिकाच्या “छपाक’वरही बहिष्कार घातला आहे. तर दीपिकाच्या विरोधात अनेक वक्तव्य केली जात आहेत. या अगोदर स्किल इंडियामार्फत वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या ‘सुई-धागा’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले होते. भारतातील कौशल्य विकास या चित्रपटाच्या प्रमोशनच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता.