मुंबई : अभिनेता अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. यासोबतच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तान्हाजी चित्रपटाला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावे असे म्हटले होते. आता, तान्हाजी चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली आहे.

 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. थोरात म्हणाले की, ''तान्हाजी चित्रपट करमुक्त कारण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. करमणूक करही आता जीएसटीच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकार SGST चा परतावा देणार आहे, मुख्यमंत्री लवकरच तशी घोषणा करतील.''

 

असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात मला पत्र लिहून महाराष्ट्रातील चित्रपट रसिक आणि शिवप्रेमींची #TanhajiTheUnsungWarrior चित्रपट करमुक्त करावा ही भूमिका आग्रहाने मांडली होती, असेही थोरात यांनी नमूद केले.                                                                                      

Find out more: