
बागी सीरीजच्या आगामी ‘बागी-3’ मध्ये जॅकी दादाची एंट्रीदेखील झाली असून त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुवारी याबद्दलची माहिती देताना सांगितले की, जॅकी या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत. पोलिस इंस्पेक्टरच्या भूमिकेत ते टायगर आणि रितेश देशमुख यांच्या ऑनस्क्रीन वडिलांचा रोल साकारणार आहे. बुधवारपासून जॅकीने चित्रपटाचे शूटिंगदेखील सुरु केले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद याबाबत म्हणाले की, मला वाटले कथेच्या गरजेनुसार, जॅकी यांनी चित्रपटाचा भाग बनले पाहिजे आणि मला वाटते की, आमचा दृष्टिकोन एक होण्याचा अर्थ हा आहे आणि चित्रपटासाठी भूमिका किती महत्वपूर्ण आहे.
या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सीरीजच्या पहिल्या चित्रपटातदेखील श्रद्धानेच मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली होती. साजिद नाडियाडवालाच्या प्रोडक्शन बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. बागी सीरीजच्या दुसऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील त्यांनीच केले होते. ‘बागी-3’ हा चित्रपट 6 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे.