बॉलीवूड मध्ये सध्या जोरदार डिमांड असलेली आलीया भट्ट पैसा आहे म्हणून खर्च करायचा यावर विश्वास ठेवत नाही. मात्र स्वतःचे एक खासगी जेट असावे आणि उंच डोंगरावर एका मस्त घर असावे अश्या तिच्या इच्छा आहेत. आलीयाला निसर्गात रमणे आवडते व त्यामुळेच तिला उंच डोंगरावर मस्त घर बांधायचे आहे.

 

एका मुलाखतीत बोलताना आलियाने तिच्या या इच्छा व्यक्त केल्या आहेत. चित्रपट आणि जाहिरातीतून आलिया खूप पैसे मिळविते. पण ती सांगते उगीच पैसे आहेत म्हणून ते खर्च करणे तिला मान्य नाही. लहानपणापासून तिची ही सवय आहे. लहानपणी आई बरोबर ती लंडनला जात असे तेव्हाही बजेट स्टोरमधूनच खरेदी करत असे. त्यात ५ ते ६ पौंडाच्या वस्तू समाविष्ट असत. विविध प्रकारच्या बॅग्ज आणि प्रवासावर मात्र ती हात मोकळा ठेऊन खर्च करते.

 

आलियाने तिच्या कमाईतून मुंबईत स्वतःचे घर घेतले आहे आणि बॉंड व म्युच्युअल फंड यात गुंतवणूक करण्यास तिचे प्राधान्य असते. आलियाचे ब्रह्मास्त्र, सडक २, तेलगु आरआरआर, गंगुबाई काठीयावाली हे चित्रपट लवकरच येत असून या वर्षात ती रणबीर कपूर सोबत विवाह करेल असेही सांगितले जात आहे.                                                               

Find out more: