
टायगर श्रॉफने प्रेक्षकांची ‘बागी ३’ बद्दलची उत्कंठा वाढवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत चित्रपटात त्याने साकारलेल्या रॉनी या व्यक्तीरेखेची अनोखी झलक यात पाहायला मिळते. अभिनेता रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांची टायगर श्रॉफसोबत या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. यामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेचीही भूमिका आहे. रितेश हा टायगरचा भाऊ ‘विक्रम’च्या भूमिकेत दिसणार आहे. तर, टायगरने ‘रॉनी’ची भूमिका साकारली आहे.
आपल्या इन्स्टाग्रामवर टायगर श्रॉफने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘बागी ३’.. ६ मार्चला रिलीज होत असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. रॉनी या व्हिडिओत आपल्या भावावर आलेल्या संकटाशी सर्व स्तरावर लढताना दिसत आहे. हा व्हिडिओ श्रद्धानेही शेअर केला आहे.
या व्हिडीओत ‘विक्रम’ आणि ‘रॉनी’ या दोन्ही भावाचा खास बॉन्ड दाखवण्यात आला आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत विक्रम अडकला, तर त्याला ‘रॉनी’ त्यामधून सोडवत असतो. पुढे विक्रम काही कामानिमित्त सिरियाला जातो. तिथे काही लोक त्याचे अपहरण करतात. त्याला सोडवण्यासाठी ‘रॉनी’ गुंडांशी कसा लढतो? ‘रॉनी’ त्याच्या भावाला वाचवू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे ६ मार्चला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळतील.
https://www.youtube.com/watch?v=vQP79hKtCZ4&feature=emb_title