मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मंगळवारी ही मोठी घोषणा केली.


याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात पुढील २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मी साऱ्यांना विनंती करतो की करोनामुक्त भारतासाठी आपण सारेच घरातच राहूया”, असे ट्विट भारताचा कर्णधार विराट कोहली याने केले.

 

तसेच फिरकीपटू हरभजनने मोदी यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘नागरिक, मुलगा, मुलगी, आई, वडिल, पती, पत्नी, भाऊ, बहिण अशा सगळ्या नात्यांनी आपली जबाबदारी ओळखा. कारण करोना रोखण्याचा हा एकमेव उपाय आहे’, अशा शब्दात हरभजनने ट्विट केलं आहे.

 

दरम्यान, ‘जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचा आपल्याकडे पुरेसा साठा आहे. अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

https://mobile.twitter.com/narendramodi?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1242478165290651654&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtradesha.com%2Fcoronavirus-modi-lockdown-move-virat-kohli-leads-way-harbhajan-advice-fans-as-cricket-community-hails-lockdown-news-update-in-marathi%2F

Find out more: