धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि करोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद फरार आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार झाला आहे. घराचीही छाडाछडती घेण्यात आली आहे.

 

मौलाना मोहम्मद साद याच्या कथित भाषणाची ऑडिओ क्लिप बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘सरकारी आणि वैद्यकीय मार्गदर्शक तत्वांचे पालन करु नका’ असा मौलाना मोहम्मद साद यांचा आपल्या पाठिराख्यांना सूचना देतानाचा आवाज या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतो. लोकसत्ता आणि इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

 

दरम्यान, दिल्लीतील निझामुद्दीन भागातील ‘मरकज’मधील ‘तबलिगी जमात’ या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर देशातील विविध राज्यांत परत गेलेले अनुयायी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना युद्धपातळीवर शोधून काढावे. त्या सर्वाना विलगीकरणात ठेवावे, असे आदेश केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्य सरकारांना दिले.

 

या घटनेवर अभिनेता आदिनाथ कोठारे यानेही नाराजी व्यक्त केली आहे. ‘आजच्या परिस्थितीत गर्दी जमा होईल असे कार्यक्रम आयोजित करणे हे एक प्रकारे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखेच आहे. मग ते धार्मिक असो की अधार्मिक. इतकं बेजबाबदार वागल्याबद्दल आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. कृपा करा, घरी थांबा,” असं त्यानं म्हटलं आहे.


https://mobile.twitter.com/adinathkothare/status/1245683906931765249?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1245683906931765249&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtradesha.com%2Fcan-you-feel-guilty-for-this-irresponsible-behavior%2F

Find out more: