मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या आपल्या पनवेलच्या फॉर्म हाऊसवर लॉकडाऊनचे दिवस घालवत आहे. तिथे तो काही पाळीव प्राण्यांसोबत आपला वेळ घालवत आहे. सलमानसोबत त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही पनवेलच्या फॉर्महाऊसवर आहेत.
दरम्यान, सलमानचे वडील सलीम खान सध्या आपल्या मुबईतील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. सलमानने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून वडिलांना भेटलेलो नाही, असं सलमान स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
सलमानने शुक्रवारी सकाळी इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत तो त्याच्या घोड्याला चारा खाऊ घालत होता. “माझ्या प्रिय घोड्यासोबत नाश्ता”, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं होतं.
सलमान सध्या सोशल मीडिया प्रचंड अॅक्टिव आहे. तो आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून घरातच राहण्याचं आवाहन करतोय. त्याचबरोबर सरकारच्या सुचनांचं पालन करण्याचीदेखील विनंती करतोय.
सलमानने ट्विटरवर मुंबईतील काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोत त्याने मुंबईकरांनी लॉकडाऊनचे नियम पाळल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. “सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं त्याबद्दल सर्वाचा आभारी आहे. देव सर्वांना सुखी ठेवेल”, असं सलमान खान म्हणाला.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपट आणि मालिकांचेही चित्रिकरण बंद पडलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो मजुरांचं मोठं नुकसान झालं आहे. या क्षेत्रातील हजारो मजुरांचं हातावरती पोट आहे. त्यामुळे अशा कामगारांना सलमान खान मदत करत आहे. तो
सलमान खान दानशूर आहे. त्याने सिनेसृष्टीतील कामगारांसाठी दोन महिन्यात 10 कोटी 50 लाख रुपयांची मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. ही मदत तो दोन टप्प्यांमध्ये करत आहे. त्यातील पहिल्या टप्प्याची मदत त्याने केली आहे. दुसऱ्या टप्प्यात तो 5 कोटी 70 लाखांची मदत करणार आहे.
https://www.instagram.com/tv/B-zitGdFHPA/?igshid=1hlw7tbhgyv9c