
कोरोनाच्या विषाणूमुळे सध्या अनेकांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. उद्योग-धंदे बंद करण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. उद्योगधंदे बंद असल्यामुळे या कामगारांच्या जेवणाचीही भ्रांत झाली आहे.
यात अभिनेता सलमान खानचाही समावेश आहे. सलमान विविध माध्यमातून गरजूंना मदत करत असून आता त्याने ‘अन्नदान चॅलेंज’ सुरु केलं आहे.
सलमानने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत हे चॅलेंज दिलं आहे. या पोस्टमध्ये सलमानचे दोन मित्र आहेत. या दोघांनी आतापर्यंत १ लाख २५ हजार कुटुंबांना किराणा सामान पुरविलं आहे.