
लॉकडाऊनमध्ये परराज्यात अडकलेले कामगार आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने यासाठी काही रेल्वे देखील सुरू केल्या आहेत. मात्र असे असली तरी कामगारांची पायपीट थांबत नाही आहे. या कामगारांकडे घरी जाण्यासाठी पैसे देखील नाहीत.
अशा स्थिती अनेकजण या कामगारंच्या मदतीसाठी पुढे येत आहे. अशाच मुंबईत अडकलेल्या कामगारांसाठी अभिनेता सोनू सूद पुढे आला आहे. त्याने मुंबईतून कर्नाटकला जाण्यासाठी शेकडो कामगारांसाठी 10 बसची सोय केली आहे. सोनू सूदने केवळ बसचीच नाहीतर या कामगारांच्या जेवणाची देखील सोय केली.
सोनू सूदने म्हटले की या कठीण काळात प्रत्येक भारतीयाचा आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा अधिकार आहे. सोबतच त्याने सरकारी अधिकाऱ्यांचे देखील आभार मानले.
उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा आणि झारखंड येथील कामगारांना देखील घरी जाण्यासाठी मदत करणार असल्याचे त्याने सांगितले. याआधी त्याने आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांसाठी मुंबईतले आपले हॉटेल दिले होते.
https://www.instagram.com/p/CAC7cxYHEIc/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again