
मुंबईतून शनिवारी शिवसेनेने पूरग्रस्तांना अन्नधान्यासह वैद्यकीय मदत पाठवली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते.
यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, राज्यातील पूरस्थिती गंभीर आहे. पूरग्रस्तांसाठी आवश्यक सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. असे असताना संकटकाळात निवडणुकांचा विचार डोक्यात कसा येतो ? अशा परिस्थितीमध्ये राजकारण करू नका, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली, कोकण यासह राज्याच्या अनेक भागात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेता, तिथे मदत आणि पुनर्वसन कामात सरकारी अधिकारी व्यस्त असतील. हे काम लवकर पूर्ण होईल, असे दिसत नाही. त्याला वेळ लागेल. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास या सरकारी अधिकाऱ्यांच्या कामावर त्याचा ताण पडेल. त्यामुळे ही एकूण परिस्थिती लक्षात घेत विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
यावेळी उद्धव ठाकरेंना पुरासंदर्भात होत असलेल्या राजकारणाविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘आता याबाबत बोलण्याची वेळ नाही. मला राजकारणात पडायचे नाही, पूरग्रस्तांसाठी मदत करणे गरजेचे आहे’. यावेळी सेल्फी आणि स्टिकर्स बदल उध्दव ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले, ‘कोण काय करतंय मला माहित नाही. पूरग्रस्तांना जे काही आवश्यक आहे ते करणे महत्वाचे आहे. आम्ही आणि आमचे लोक काम करतात’, असे ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवन येथून कोल्हापूर व सांगली मधील पूरग्रस्तांसाठी शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक आणि वैद्यकीय मदत रवाना करण्यात आली.