नवी दिल्ली : पाकिस्तान काश्मीर ३७० कलम हटविल्यानंतर स्थिर मनस्थितीत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कारण भारताला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युद्धाची धमकी दिली आहे. केवळ काश्मीर पर्यंत थांबणार नसून भारत पाकव्याप्त काश्मिरमध्ये देखील घुसखोरी करु शकतो असे त्यांनी म्हटले. त्यांनी बालाकोट एअर स्ट्राईक देखील स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
बालाकोटपेक्षा जास्त भयावह प्लान भारताने बनवला आहे. भारत पाकव्याप्त काश्मिरमध्ये बालाकोटपेक्षाही मोठी कारवाई करेल. जर युद्ध झाले तर याची जबाबदारी भारताची असेल. आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ असेही इम्रान खान म्हणाले. शिमला करार भारताने तोडला असल्याचा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अल्वी यांनी केला आहे. पाकिस्तान काश्मीर जनतेची मदत करणे सुरुच ठेवणार आहे. आम्ही भारताच्या निर्णयाविरुद्ध संयुक्त राष्ट्र संघात जाणार असल्याचेही ते म्हणाले.