पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना तेथील स्थानिक नागरिकांचे व तेथील पशुधनाचे बरेच मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड (जिल्हा) च्यावतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या जनावरांना कडबा-कुटीचा ट्रक पाठविण्यात आला.
यावेळी संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते विठ्ठल(नाना)काटे, नगरसेवक राजू मिसाळ, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, महीला संघटीका कविता खराडे, खजिनदार संजय लंके, सरचिटणीस अमोल भोईटे, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष यतिन पारेख, उपाध्यक्ष संतोष वाघेरे, युवा नेते ऋषीकेश वाघेरे पाटील, बिपीन नाणेकर, दिगंबर वाघेरे, आण्णा कापसे, गणेश भोसले, बाळु भालशंकर, अजित शेख तसेच पिंपरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.