आगमी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय धोरण ठरविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या देवगिरी प्रातांची वाळुज येथील मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे बैठक पार पडली. दिवसभर चालेल्या या बैठकीत मराठवाडा आणि खान्देश सर्व लोकप्रतिनिधी आणि संघाचे प्रांत प्रमुख उपस्थित होते. यात संघाची कार्यप्रणालीसह आगामी विधानसभेची व्ह्युरचना आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवा संघातर्फे दरवर्षी दोन वेळा अशा प्रकाराची बैठक घेण्यात येत असते. लोकसभा निवडणुकीपुर्वीी संघाच्या औरंगाबाद कार्यालयात संघ आणि भाजपच्या लोकप्रतिनिधी मध्ये बैठक पार पडली होती. त्याच पद्धतीने ही बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीची गुप्ताता पाळण्यात आली होती.
या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, कामगारमंत्री संभाजीराव निलेंगेकर, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, खासदार रक्षा खडसे यांच्यासह संघाची संबंधित असेलल्या संस्था कार्यकर्ते उपस्थित होते.
यात प्रमुख्याने समरस्ता आणि कुटुंब प्रबोधन हे समाजासमोरील ज्वलंत प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होईल. यासह संघाच्या संघटनात्मक पातळीवर कार्याची स्थिती या बैठकीत जाणून घेण्यात आली आहे. यासह मराठवाड,खान्देशातील समस्यावर चर्चा करण्यात आली. यात दुष्काळसह अन्य प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे. काही विषयावर सामुहिक चिंतन, काही विषयावर विचार मांडले असे देवगिरी प्रांताचे कार्यकारी सदस्य वामन देशपांडे यांनी सांगितले.