पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे, असे गौरवोद्‌गार इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी काढले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई, स्टार की हिअरिंग फाऊंडेशन, अपंग विकास संघ, महात्मा गांधी सेवा संघ, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या वतीने इंदापूर येथे 228 कर्णबधीर रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आली. शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, किसनराव जावळे, नगरसेवक श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, मुख्याध्यापक प्रा. अमोल उन्हाळे, डॉ. शरद पडसळकर उपस्थित होते.

ठाकरशी ग्रुप मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिरात स्टार की संस्थेचे डॉ. सागर काणेकर, डॉ. निहार प्रधान, डॉ. यशवंत सिंग, डॉ. रवी गुप्ता, डॉ. स्टेजिन बेनी, डॉ. पी. शरथ यांनी तपासणी केली.                                                                                                         


Find out more: