पैठण तालुक्यात विकासाचे प्रश्न गंभीर असून या भागातील आमदारांनी काय केले असा प्रश्न जन अशिर्वाद यात्रेतील युवराजांना विचारावा, असे म्हणत राष्ट्रवादीचे शिरूरचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. विकासाच्या प्रश्नावर संताच्या भुमीवर बये दार उघड म्हणण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली शिवस्वराज्य यात्रा आज पैठण येथे आली. यावेळी संत एकनाथांच्या भूमीत विरोधकांनी सत्ताधारी भाजप-सेना युतीला चांगलेचं खडे बोल सुनावले. यावेळी कोल्हे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेची खबर लागताचं भाजपच्या चाळीस पैशांच्या लावरीसांमध्ये पोठसूळ उठला, शिवस्वराज्य यात्रा का काढता, असं आम्हाला विचारलं जात. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या एकट्याची जहागीरी आहे का ?, असा खोचक सवाल कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारकडून कडाडून टीका केली आहे. राज्यातील भाजप सरकार असंवेदनशील आहे, पुरामध्ये माणसांचे प्राण जात असताना मंत्री फोटो काढत फिरतायत. जनतेची कसली टिंगलटवाळी चालली आहे, सरकारला कसली मस्ती आली आहे, अशी टीका पवार यांनी केली.                                                                                  

Find out more: