मुंबई – कोहिनुर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. यावेळी ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब रवाना झाले. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत का सत्यनारायणाच्या पूजेला?, असा सवाल दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या कि, राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.