
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रादरम्यान विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. माजी मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव पाचपुते राष्ट्रवादीत असताना भाजपसाठी बबन्या होते. मात्र भाजपप्रवेश होताच ते बबनराव कसे झाले. असा टोला मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ते जिंतूर येथे बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. याच यात्रेतून मुंडे यांनी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला.
ते पुढे म्हणाले आत्ता भाजपमध्ये असलेले बबनराव पाचपुते जेव्हा राष्ट्रवादीत मंत्री होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचारी असल्याचे आरोप केले. त्यावेळी ते तुमच्यासाठी बबन्या होते. मात्र भाजपमध्ये येताच ते बबनराव झाले. असा खोचक टोला मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
मुख्यमंत्री यांच्या या भूमिकेमुळे, त्यावेळी झालेले आरोप फक्त राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्यासाठी होते. नाहीतर भाजप पक्षात भ्रष्टाचारी आहे हे फडणवीस यांनी मान्य करायले हवेत असेही मुंडे म्हणाले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते भाजपमध्ये जाताच पवित्र कसे होतात असा प्रश्न मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. तर खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा देखील काढली आहे. या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप सरकारला चांगलेचं धारेवर धरले आहे. तर जनतेमध्ये ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा’ हे बीज रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.