![](https://www.indiaherald.com/cdn-cgi/image/width=750/imagestore/images/politics/politics_latestnews/चंद्रकांत पा-415x250.jpg)
पुणे : न्यायालय, आयकर विभाग या जशा स्वायत्त संस्था आहेत, तशीच सक्त वसुली संचालनालय (ईडी) ही देखील स्वायत्त संस्था आहे. “ईडी’च्या माध्यमातून दोन वर्ष रेकी केल्यानंतरच तपासणी केली जाते. भाजपने सांगितले म्हणून कारवाई होत नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप भाजपावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी पाटील यांना प्रश्न विचारला असता ते बोलत होते.
गणेशोत्सवात मंडळानी डीजे लावल्यास कारवाई करणार का, यावर पाटील म्हणाले, “डीजेबाबत निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही. डीजे लावल्यास त्यावर खटले दाखल केले जातील जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. कोल्हापूर जसा डॉल्बीमुक्त झाला तसाच पुणे जिल्हाही डॉल्बीमुक्त होईल.’