नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका ६ सप्टेंबर रोजी होणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र भरणे, ४ सप्टेंबर रोजी निवडणुकीसाठी प्रेसिडेंशिअल डिबेट, तर ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते १ व दुपारी २.३० ते ५.३० दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांचे निकाल ८ सप्टेंबर रोजी लागणार असल्याची माहिती निवडणूक समितीचे अध्यक्ष शशांक पटेल यांनी दिली. २५ ऑगस्ट रोजी मतदारांची यादी जाहीर होईल. ६ ऑगस्ट रोजी नामांकन अर्ज वाटप तर २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते ५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

२८ ऑगस्ट रोजी वैध उमेदवारांची यादी जाहीर तर याच दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. दुपारी तीन वा. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. ३ सप्टेंबर रोजी विद्यापीठाची जनरल बॉडी मीटिंग दुपारी १ वा. सुरू होईल. तर ४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना आपले उमेदवार व त्यांचे निवडणुकीतील मुद्दे जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. रात्री ९ वा. जेएनयूची प्रेसिडेंशिअल डिबेट होईल. ६ सप्टेंबर रोजी मतदान होईल.                                                                          


Find out more: