काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर राज्यातील वातावरण शांत ठेवण्यासाठी सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतू, इथली परिस्थिती पाहूण एका आयएएस अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. केरळमध्ये वास्तव्याला असलेल्या आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथ यांनी जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

कन्नन गोपीनाथ ऑगस्ट 2018मध्ये चर्चेत आले होते. त्यांनी राज्यातील भीषण पुरातून लोकांचं बचावकार्य राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेशांचे केडर राहिलेल्या आणि वर्षं 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी कन्नन यांनी केंद्राकडे राजीनामा पाठवला आहे.

ते म्हणाले, देशातल्या एका मोठ्या भागात अनेक काळापासून मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. तसेच इतर राज्यांकडून त्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याने मला दुःख होते. असा अन्याय समाजातल्या खालच्या स्तरापर्यंत होत असतो. मला हे स्वीकारार्ह नाही. त्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, केंद्रशासित प्रदेशातल्या पूरग्रस्तांना कशा प्रकारे मदत करत आहात, याचा रिपोर्ट न दिल्यानं कन्नन यांना केंद्रानं नोटीस पाठवली होती. गोपीनाथ म्हणाले, सेवेतून बाहेर पडल्यानंतर पुढे काय करायचं याचा विचार केलेला नाही. फक्त मला आता ही सरकारी नोकरी लवकरात लवकर सोडायची आहे. हाच माझा उद्देश आहे.

Find out more: