
'बर्फी' चित्रपटातील अभिनेत्री इलियाना डिक्रूज गेल्या दहा वर्षांपासून ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्रयू नीबोनला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या लग्नाची बातमी आली होती. यासोबतच इलियाना प्रेग्नेंट असल्याची चर्चा देखील बॉलिवूडच्या वर्तुळात रंगली. मात्र, सध्या या जोडीमध्ये काहीतरी बिनसल्याचे दिसत आहे. इलियाना आणि अँड्र्यूने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले असून पेजवरील एकमेकांसोबत असलेले फोटोसुद्धा डिलीट केले आहेत.
स्पॉटबॉय वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांमध्ये मोठे भांडण झाले आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलत नसल्याचे समजते. यावरुन या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. इलियानाचे इन्स्टाग्रामवरील स्टेटस पाहून ती ब्रेकअपला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. 'जोपर्यंत तुम्ही ओझे खाली ठेवत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते ओझे असल्याचे कळत नाही', असे इलियानाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
इलियानाने एकदा इन्स्टाग्रमावर एक फोटो शेअर करत अँड्रयूचा उल्लेख 'Hubby' (पती) असा केला होता. यावरुन या दोघांनी लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गॉसिप व्हावे, असे मला वाटत नाही, असे इलियानाने एका मुलाखतीत म्हटले होते. यासोबतच प्रेग्नेंसी संदर्भात देखील इलियानाने एक पोस्ट केली होती. 'चांगल्या गोष्टी ऐकाव्यात व वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करावे', अशी पोस्ट इलियानाने केली होते.
अजय देवगनच्या 'रेड' या चित्रपटात इलियाना दिसली होती. यासोबतच इलियाना 'अमर अकबर अँथनी' या तेलुगू चित्रपट दिसली होती. इलियाना आता 'पागलपंती' या चित्रपटात दिसणार आहे.