नवी दिल्ली – गृह मंत्रालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विशेष सुरक्षा हटवून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विद्यमान सुरक्षेची समीक्षा करुनच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय सध्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाच एसपीजी सुरक्षा आहे. मनमोहन सिंह यांना झेड प्लस सुरक्षेमध्ये 55 सुरक्षा रक्षक आहेत. त्यांच्या एसपीजी सुरक्षेमध्ये तब्बल 200 जवान असल्याची माहिती आहे. त्या सर्वांना परत येण्याचे आदेश दिले आहेत.

केवळ झेड प्लस सुरक्षा मनमोहन सिंग यांना पुरवली जाणार आहे. यापुर्वी सरकारने उत्तर प्रदेशमधील नेत्यांची सुरक्षा हटवली आहे .त्यामध्ये लालू प्रसाद यादव, सतीश चंद्र मिश्रा, सुरेश राणा, चिराग पासवान, पप्पू यादव, अखिलेश यादव यांचे नाव सामील आहे. खासदारांची सुरक्षा हटवल्यानंतर १३०० हून अधिक कमांडो या कामातून मुक्त झाले होते.

                                                                                                                                                                         

Find out more: