राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकी आधीच धक्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी निवडणुकी आधीच पक्षाची साथ सोडली आहे. तर काही नेते शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरवत असल्याचं दिसत आहे. शिवस्वराज्य यात्रा आज साताऱ्यात दाखल झाली. मात्र सातारचे खा. उदयनराजे भोसले यांनी या यात्रेकडे पाठ फिरवली असल्याचं सांगितल जात आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले देखील भाजपवासी होणार असल्याच्या चर्चेनी जोर पकडला आहे.

गेले काही दिवस उदयनराजे भोसले हे भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. तर उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वारंवार भेटीगाठी देखील होत आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठोपाठ उदयनराजे भोसले हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही केवळ चर्चा असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतू आजच्या शिवस्वराज्य यात्रेला राजेंची असणारी गैरहजेरी ही भाजप प्रवेशाचे पहिले पाऊल तर नाहीना ? असा सवाल आता उपस्थितीत होऊ लागला आहे.

दरम्यान भाजपच्या वाटेवर असणारे राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील शिवस्वराज्य यात्राकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता उदयनराजे यांनी देखील शिवस्वराज्य यात्रेला टोलावल आहे. त्यामुळे राजे देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे.                      

Find out more: