राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची गळती सुरूच आहे. आता माण – खटावचे आमदार. जयकुमार गोरे यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. १ सप्टेंबरला जयकुमार गोरे आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे भाजपात प्रवेश करत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रसला खिंडार पडणार आहे.
जयकुमार गोरे भाजपत जाणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरु आहे. मात्र आज अखेर मुहूर्त ठरला असून जयकुमार गोरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. १ सप्टेंबरच्या भाजपच्या मेगा भरतीत जयकुमार गोरे सहभागी होऊन भाजपात प्रवेश करणार आहेत. मतदारसंघातील खुंटलेल्या विकासाचे कारण पुढे करूनच जयकुमार गोरे भाजपात प्रवेश करणार आहेत.
दरम्यान भाजप प्रवेशाच्या चर्चेचे जयकुमार गोरे यांनी अनेकदा खंडन केले होते. मी भाजपात जाणार नसल्याच त्यांनी म्हंटल होत. मी भाजपमध्ये जाणार असं म्हणणाऱ्यांनी आधी डोकं तपासून घ्यावं, असे आमदार गोरे यांनी म्हंटले होते. मात्र अखेर जयकुमार गोरे यनी भाजपचीचं वाट धरली आहे.