लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाचं लावला आहे.
याचं पार्श्वभूमीवर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी ‘मला तर आता असं वाटतंय की राजकारणातूनच अलिप्त व्हावं अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे उदयनराजेंच्या मनात नक्की आहे तरी काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच भाविश्यात ते नेमका काय निर्णय घेणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, उदयनराजेंसह रामराजे निंबाळकरही राष्ट्रवादी सोडणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहेत. या दोघांसह कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा राष्ट्रवादीला रामराम ठोकणार आहेत. त्यामुळे एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता परंतु आता त्याला सुरुंग लागलेला आहे.
यापूर्वी वैभव पिचड, चित्रा वाघ, गणेश नाईक, दिलीप सोपल यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील नेते राणा जगजीत हेही पक्ष सोडणार आहेत. तसेच कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.