जम्मू काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने चांगलाच तांडव सुरू केला आहे. काश्‍मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जावून स्वत:ची गोचीदेखील पाकने करून घेतली. दरम्यान, सर्व प्रयत्न करून थकलेल्या पाकने आता भारतासमोरच नवा प्रस्ताव ठेवला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्‍मीरबद्दल वक्तव्य केले आहे.

जम्मू काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे कलम हटवण्याचा भारताने घेतलेला निर्णय जर मागे घेतला तरच भारतासोबत चर्चा होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत. इम्रान खान एवढ्यावरच नाही थांबले तर त्यांनी पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे.

काश्‍मीरप्रश्नी जगातील कोणीही हस्तक्षेप केला नाही तर अण्विक शक्ती असलेले दोन्ही देश युद्धाच्या जवळ पोहोचतील. काश्‍मीर मुद्द्यावरील चर्चेत प्रामुख्याने काश्‍मीरी लोकांना सहभागी केले पाहिजे. परंतु भारताशी चर्चा तेव्हाच होईल, जेव्हा भारत काश्‍मीरवरील अवैधरित्या असलेला ताबा सोडेल. तसेच सैन्य परत बोलावेल आणि कर्फ्यू काढेल, अशा अटी इम्रान खान यांनी भारतासमोर ठेवल्या आहेत.

एका इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये लिहिलेल्या लेखातून त्यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. जर अन्य देशांनी काश्‍मीरप्रश्नी भारताला थांबवण्यासाठी पावले उचलली नाहीत तर संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.                                                                                                          


Find out more: