पुणे – राज्यात ज्यांना सत्तेपासून कायम दूर ठेवण्यात आले, अशा दुर्लक्षित आणि वंचित समाजाला एकत्र करून त्यांना सत्तेत वाटा मिळवून देणार, असे आश्‍वासन ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिले. पुणे शहरात वडार समाजाच्या सत्ता संपादन मेळावाप्रसंगी ते बोलत होते.

ऍड. आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील निवडणुका झाल्यावर पूर्ण सत्ता हातात येईल आणि त्यानंतर आरक्षण काढून घेण्यात येईल. त्यामुळे आरक्षित वर्गाने सावध होण्याची हीच वेळ आहे. ऑक्‍टोबरआधी निवडणुका झाल्या पाहिजेत. आम्ही कोणासाठी थांबणार नाही, आम्ही आगेकूच करणार असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी या मेळाव्याचे संयोजक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रभा वाडकर तसेच लष्कर-ए-भिमाचे संस्थापक सचिन धिवार यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला. यावेळी आघाडीचे प्रदेश महासचिव अनिल जाधव, नवनाथ पडळकर, संतोष संखंद आदी उपस्थित होते.                                                                                                             


Find out more: