पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी पाकिस्तानने दिली असून पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा आणि शहीद दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान काश्मीरबाबत पुन्हा राग आळवला आहे. काश्मीरमध्ये लोकांवर अत्याचार होत असल्याचा खोटा आरोप बाजवा यांनी केला आहे.

त्याचबरोबर लष्कर प्रमुख असेही म्हणाले की, तेथील जनतेच्या इच्छेनुसार काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाला हवा. पण तसे जर झाले नाही तर त्यासाठी आम्ही कोणत्याही स्तराला जाण्यास तयार आहोत. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० केंद्र सरकारने रद्द केल्यापासून सतत युद्धाची धमकी पाकिस्तान देत आहे. पाकिस्तान लष्कर मुख्यालय रावळपिंडीमध्ये आज आयोजित कार्यक्रमात बोलत असताना बाजवा असे म्हणाले की, काश्मिरींच्या अधिकारांवर हल्ला केला जात आहे.

आमच्या लष्करासाठी जे एक आव्हान आहे. कारण पाकिस्तान आणि काश्मिरी जनतेचे हृदय हे एकच आहे. काश्मिरींसाठी आम्ही प्रत्येक कुर्बानी देण्यास तयार आहोत. शेवटच्या गोळीपर्यंत, शेवटच्या शिपायापर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढू. आम्ही यासाठी कोणत्याही स्तराला जाण्यास तयार आहोत.

दरम्यान, पाकिस्तानने अशा प्रकराची धमकी देण्याची ही काही पहिली वेळ नाही. कारण अशा प्रकारची धमकी त्यांच्या पंतप्रधानांपासून त्यांच्या अनेक मंत्र्यांनी दिली आहे. या लोकांनी फक्त युद्धाचीच नव्हे तर अणू युद्धाची देखील धमकी दिली आहे. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी जम्मू-काश्मीरबाबत अनेक ट्विट केले आहेत.


Find out more: