मराठवाड्यातला दुष्काळ लवकरच संपवणार असल्याच वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये केल आहे. यासाठी कोकणातून मराठवाड्यात पाणी आणणार असल्याच त्यांनी सांगितले आहे. या कामासाठी ६४ हजार किमीची पाईपलाईन उभारण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

मुंबईतल्या मेट्रो मार्गांच्या ३ प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. चार वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ आहे. तो दूर करण्याचे लक्ष्य सरकारपुढे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबादमध्ये औरिक सिटीचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. औरंगाबादमधून समृद्धी महामार्गही जातोय. या महामार्गामुळेही विकास होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी महिला बचतगटांचेही कौतुक केले. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांची हजेरी होती.                                                                                                                                                           


Find out more: