वंचित बहुजन आघाडीमधील अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षात येण्यास उत्सुक आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली.नागपूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आठवले यांनी वंचित आणि एमआयएमची युती तुटल्याबद्दलही भाष्य केले.

आठवले म्हणाले की, वंचितसोबतची युती तोडण्याचा एमआयएमचा निर्णय योग्य आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत राहून एमआयएमला काहीही फायदा होत नव्हता. उलट वंचितला एमआयएमचा फायदा होत होता.

एमआयएम जरी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडली असली तरी आम्ही महायुतीतून बाहेर पडणार नाही, असेही आठवले मिश्‍कीलपणे म्हणाले.एमआयएमचा एकमेव खासदारही एमआयएमच्या चिन्हावर निवडणून आला आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कोणतेही योगदान नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी म्हणत असले, तरी वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता होईल, तरी मला असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला फारशी मतं मिळणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.                                                                   

                                                 

Find out more: