ईव्हीएमविषयी मी बोलायला लागलो, की 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवतात. ईव्हीएमविषयी मनात शंका आहे ती आहेच, साठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो होतो. राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, दोन-अडीच लाखांनी निवडून आलो नाही, तर माझं नाव बदला, असं खुलं आवाहन शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.
‘ईव्हीएम असेल, तर काय गोष्टी वेगळ्या असत्या? भाजपचे अनेक मंत्री लगेच सांगायला सुरुवात करतात, आमच्या जागा एवढ्या असत्या, आमच्या जागा तेवढ्या असत्या. ईव्हीएमविषयी जर मी सांगायला लागलो, तर 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवतात.
तुम्ही निवडून आलात त्याचं काय?’ असा प्रश्न विचारला जात असल्याचं अमोल कोल्हे सांगत होते.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित केली आहे. ही यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात पोहचली, तेव्हा डॉ. कोल्हे बोलत होते.
‘मी कायम जाहीरपणे सांगतो. ईव्हीएमविषयी मनात शंका आहे ती आहेच. जर ईव्हीएम नसतं, तर शिरुरमधून एक शेतकऱ्याचं साधं पोरगं साठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलं. घ्या बॅलेट पेपरवर निवडणूक, घ्या राजीनामा, नाही दोन-अडीच लाखांनी निवडून आलो, तर नाव बदला माझं’ असं ओपन चॅलेंज अमोल कोल्हेंनी दिलं.