ऍप आधारित कॅब सेवांनी प्रवास करण्याकडे भारतीयांचा कल वाढला असल्यानेच वाहन उद्योगात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केले.
ओला-उबेरने प्रवास करण्याकडे श्रीमंत भारतीयांचा वाढलेला कल आणि बीएस6 याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला आहे, असे अर्थमंत्री म्हटल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सर्व प्रकारच्या वाहनविक्रीत ऑगस्ट महिन्यात विक्रमी घट झाली. तर प्रवासी मोटारींची विक्री 41.09 टक्क्यांनी घटली. त्यामुळे जीएसटी करांत सवलत देण्याची मागणी वाहन उत्पादकांनी मागणी केली. त्याकडे लक्ष वेधले असता हा निर्णय माझ्या एकटीच्या हातात नसल्याचे सांगून त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.