भाजप प्रवेशाबाबत चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत भाजप पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांशी उदयनराजेंची सुमारे दीड तास चर्चा झाली. मात्र, तरीही प्रवेशाचा निर्णय गुलदस्त्यात राहिला आहे.
भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात उत्सुकता लागून राहिली आहे. भाजपमध्ये प्रवेश करायचा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे, याबाबत त्यांनी सोमवारीच पुण्यात समर्थकांशी चर्चा केली होती. मोजक्या समर्थकांशी झालेल्या चर्चेवेळी वेगवेगळे मतप्रवाह आल्याने उदयनराजेंनी कोणताही निर्णय दिला नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला तर विधानसभेबरोबर लोकसभेची निवडणूक लागत नाही, अशा परिस्थितीत विधानसभेनंतर होेणार्या निवडणुकीत पुन्हा निवडून येताना अनेक आव्हाने निर्माण होणार असल्याचे काही समर्थकांनी सोमवारच्या चर्चेवेळी सांगितले होते; तर काही समर्थकांनी पुन्हा निवडून येणे अशक्य नाही. उलट, भाजपमध्ये राजकीय भवितव्य आहे, बुडत्या जहाजात बसायला नको अशी भूमिकाही मांडली होती. त्यामुळे उदयनराजेंची तळ्यात मळ्यात भूमिका झाली होती.
सोमवारच्या चर्चेवेळी सांगितले होते; तर काही समर्थकांनी पुन्हा निवडून येणे अशक्य नाही. उलट, भाजपमध्ये राजकीय भवितव्य आहे, बुडत्या जहाजात बसायला नको अशी भूमिकाही मांडली होती. त्यामुळे उदयनराजेंची तळ्यात मळ्यात भूमिका झाली होती. सोमवारच्या चर्चेनंतर ठोस निर्णय न घेता त्यांनी आपला सस्पेन्स कायम ठेवला होता. त्यानंतर समर्थकांना चकवा देवून उदयनराजे मुंबईला निघून गेले होते. ऐनवेळी ते धक्कातंत्र वापरणार असे बोलले जात होते.
मंगळवारी अचानक त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी भाजप प्रवेश करायच्या निर्णयापर्यंत उदयनराजे पोहोचले. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस व उदयनराजे यांच्यामध्ये सुमारे दीड तास ही चर्चा झाली. ही चर्चा भाजप प्रवेशासंदर्भात झाली. प्रवेश केला तर कसा करायचा? कधी करायचा? प्रवेशानंतर भाजपकडून नेमके काय मिळणार? या विविध बाबींवर चर्चा झाली.
मात्र, प्रवेशाचा निर्णय गुलदस्त्यात राहिला आहे. उदयनराजे स्वत:च याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत. उदयनराजे राजीनामा देणार का? दिला तर कधी देणार? भाजपमध्ये कधी प्रवेश करणार? की मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही राष्ट्रवादीतच राहणार याविषयी उत्सुकता आहे.