लाडक्या बाप्पाच्या विसर्जणासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. मुंबई – पुण्यात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यावेळी प्रशासनाकडून डीजेच्या आवाजावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. याची अमलबजावणी देखील सक्तीने केली जाणार आहे.
याचा फटका मनसे नेत्या रुपाली पाटील यांना बसला आहे. डीजे आणि डॉल्बीबाबत कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे मनसे नेत्या रुपाली पाटील यांना कलम 144 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
डीजे डॉल्बीबाबत कायद्याचं उल्लंघन केलं तर कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीच दिला होता. मात्र रुपाली पाटील यांनी डीजे डॉल्बीबाबत कायद्याचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याच सांगण्यात येत आहे.
यावर रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. रुपली पाटील म्हणाल्या की, चंद्रकांत पाटील हे सूडबुद्धीने वागत आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांना भाऊ म्हणून दादा म्हणावं की गुंड म्हणून दादा म्हणावं’ अशी टीका त्यांनी केली आहे.
पुण्यातील मनाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवनुकींना सुरवात झाली आहे. ढोल – तश्याच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. भव्य मिरवणुका आणि आकर्षक रांगोळ्या पाहण्यासाठी पुण्यात आज मोठ्या संख्यने भाविक येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ८००० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये एसआरपी, सीआरपीएफ, बॉम्ब स्कॉडचा देखील समावेश आहे. तसेच वाहतुकीत देखील काही बदल करण्यात आले आहेत.