काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला आहे. तेसच काँग्रेस -राष्ट्रवादीला पक्षाची आज झालेल्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन करण्याचा सल्लाही त्यांनी सातारा येथे बोलताना दिला. भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आज उदयनराजे भोसले हे महाजानदेश यात्रे मध्ये सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

उदयनराजे पुढे बोलताना म्हणाले की ,काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकार काळात जनतेची घेऊन गेलेली कामं कधीच झाली नाहीत. माझ्याकडून नेण्यात आलेल्या कामांच्या प्रस्तावांना कायम केराची टोपली दाखवली गेली, तरीपण मी १५ वर्षे सोबत होतो, खरतर याबाबत राष्ट्रवादीने मला सहनशीलतेचा पुरस्कार द्यायला हवा होता. असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली.

यावेळी उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामकाजावर टीका केली. ते म्हणाले की, त्या काळात सरकारची इच्छाशक्ती व नियोजन नसल्यामुळे कामं झाली नाहीत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारची स्तुती करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यासाठी हजारो कोटींची कामं मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.

                                                                                                            

Find out more: