लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रस-राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. अनेक आमदार, खासदारांनी पवारांची साथ सोडून हाती कमळ, धनुष्यबाण घेण्यासाठी सत्ताधारी पक्षात रांग लावली आहे. मात्र आगामी विधासभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष चांगलेच सक्रीय होताना पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंडे म्हणाले, सुडाचे हे राजकारण आपण कधीच केले नाही, आणि करणार नाही असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे इमारतीचा हस्तांतरण सोहळा दरम्यान बोलत होते. तसेच पुढे बोलताना मुंडे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी आवाहन केले आहे.

म्हणाले की, तुमच्यातला पोरगा तुमच्यासाठी राबत असताना परळीची जनता म्हणुन पाठीशी उभे रहावे, एवढी अपेक्षा व्यक्त करताना या मातीतील माणुस आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, त्याचे दरडोई उत्पन्न दुप्पट व्हावे हे आपले स्वप्न असून, संधी मिळाल्यास ते करून दाखवण्याची धमक आहे, त्यासाठी आशिर्वाद द्या असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

दरम्यान, पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, सत्ताधारी पक्षांच्या विचारांची संस्था असली तरी, समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाला नगर पालिकेने आज भव्य इमारत बांधुन दिली असून, पत्र्याच्या शाळेत शिकणारे 500 विद्यार्थी आज पक्क्या आणि सुंदर इमारतीत शिक्षण घेणार आहेत, याचा आपल्याला आनंद होत असून परळीतील प्रत्येक माणसाचे स्वप्न दुप्पट करण्याचे माझे स्वप्न आहे.



Find out more: