राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेत आपली पाहिली उमेदवारांची यादी घोषित केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले आहेत. सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना धनंजय मुंडेंच्या होमपिचवर शरद पवारांनी राष्ट्रवादीची पहिली जाहीर केली. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर गेवराई- विजयसिंह पंडित, केज- नमिता मुंदडा, बीड- संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. एकमेव आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा म्हणजे बीड अशी ओळख आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण, 2014 ला बीडमध्ये राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे शरद पवारांनी जाहीर केलेले उमेदवार नक्की कशी लढत देतात यावर बीडमध्ये राष्ट्रवादीचे भवितव्य ठरणार आहे.                                                                                                          


Find out more: