निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि हरियानामधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकांसह देशातील अनेक ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांना धक्का बसला आहे. उदयन राजे यांनी जेव्हा भाजप प्रवेश केला तेव्हा विधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने यासंदर्भात कोणतेही भाष्य केले नाही त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली आहे.
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सातारा येथून उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आता विधानसभेनंतर निवडणूक होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील सर्व म्हणजे २८८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याची अर्ज भरण्याची तारीख 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरअसणार आहे तर अर्जाची छाननी 5 ऑक्टोबर, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर तर मतदान 21 ऑक्टोबर निवडणूक निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत.