विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निमित्तानं तुम्हाला शिरूर तालुक्यातील एका माकडांच्या गावाबद्दल माहिती देणार आहोत. एकमेकांचे पक्के राजकीय विरोधक आणि २०१९ चे उमेदवार असलेलेल्या शिरूरच्या आजी-माजी आमदारांमध्ये रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत एक शीतयुद्ध सुरू झालं आहे.
त्याचा शेवट निवडणुकांनंतर होणार आहे हे मात्र नक्की. भाजपचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनी कुरुळी गावच्या एका सभासदाला भर सभेत "माकड" म्हटलं आणि यामुळे सभासद चिडले आणि माकडांच्या गावात आमदारांना येऊच देणार नाही असा या गावकऱ्यांनी निर्णयही घेतला.
शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अशोक पवार यांनी कारखानदारी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत येत असल्याचा आरोप केला होता. यावर कारखान्याकडून पॉवर परचेस करार करण्यात आलाच नसल्याचे सांगितलं. याला कारखाना प्रशासन दोषी आहे आणि त्याचं खापर सरकारच्या डोक्यावर फोडलं जात असल्याचा पलटवार आमदार बाबुराव पाचर्णें यांनी केला.
अंबादास बोरकर या सभासदाने आमदारांना प्रतिप्रश्न केल्याने आमदार बाबुराव पाचर्णे भलतेच चिडले आणि मग या सभासदाला 'ये माकडा खाली बस' असा अपशब्द वापरला. यावर सभासद आणि उपस्थित भलतेच संतापले. आमदारांना गाव बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांकडून घेण्यात आला आहे.