मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी 2,238 झाडे अखेर काल रात्री कापण्यात सुरुवात झाली आहे.
याविरोधात नागरिकांनी व पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणात ‘आरे वाचावा’ आंदोलनास सुरुवात केली आहे. काल रात्री पासून याठिकाणी पोलीस आंदोलकांची धरपकड करत असून परिसरात 144 कलम लागू केला आहे.
दरम्यान, आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘आरे’ला पाठींबा दर्शविला असून, ‘आंदोलन झालं ते शांततेच्या मार्गानं झालं. मग पोलिसांनी आंदोलकांना अटक का केली? असं सवाल उपस्थित केला आहे’. तसेच, सत्ता आल्यानंतर आरेला जंगल घोषित करणारच अशी घोषणा सुध्या आदित्य यांनी केली आहे.