मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. ही घटना आज (5 ऑक्टोबर) दुपारच्या दरम्यान लोणावळ्याजवळ  घडली असल्याचे सांगितलं जात आहे. या अपघातात राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि बहीण किरकोळ जखमी  झाल्या आहेत. घरी परतत असताना हा अपघात झाला आहे.

राज ठाकरे आज सहपरिवार लोणावळ्याच्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी राज यांची पत्नी, बहीण, सून, मुलगा अमित ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरेही होती.

दर्शन घेऊन घरी परतत असताना अचानक त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. इनोव्हा गाडीला हा अपघात झाल्याचे बोललं जातं आहे. या गाडीमध्ये शर्मिला ठाकरे आणि राज यांची बहीण होती.

येत्या 9 ऑक्टोबरपासून राज ठाकरे आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. मात्र यापूर्वी त्यांनी सहपरिवार एकविरा देवीचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत मनसेनेही आपले उमेदवारी उभे केले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे पुतणे आदित्य ठाकरेही वरळी विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या पुतण्याच्या विरोधातही उमेदवार दिला नाही.                                                                                           


Find out more: