चिंचवड विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणारे महापालिकेचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे हे सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत. राहुल कलाटे यांच्याकडे 47 कोटी 42 लाख 29 हजार 762 रुपयांची स्थावर मालमत्ता आणि 99 लाख रुपयाची जंगम मालमत्ता आहे.

तर त्यांच्यावर 8 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज आहे.राहुल कलाटे यांच्या नावावर 47 कोटी 42 लाख 29 हजार 762 रुपयांची स्थावर तर 99 लाख 10 हजार 854 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

तसेच त्यांच्या पत्नी वृषाली यांच्या नावावर 17 लाख 43 हजार 184 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये राहुल कलाटे यांच्याकडे 5 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 15 तोळे सोने तर पत्नी वृषाली यांच्याकडे 15 लाख 75 हजार रुपयांचे 45 तोळे सोने व 94 हजार रुपये किंमतीचे दोन किलो चांदीचे दागिणे आहेत. कलाटे यांच्याकडे 55 हजार रुपयाची रिव्हॉल्व्हर आहे. तसेच एक मर्सिडीज बेन्ज गाडीही आहे.

राहुल कलाटे यांच्या नावावर खेड तालुक्‍यातील सोळू, मुळशी तालुक्‍यातील नेरे येथे जमीन आहे. तसेच रहाटणी येथील त्यांचा फ्लॅट या सर्वांची 47 कोटी 42 लाख 29 हजार 762 रुपये आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.                                       


Find out more: