“जनतेला तुम्ही म्हणाला होता की, हा मोदी कोण, कोण लागून गेला? त्याला घाबरायचे काय काम ,आमच्याकडे मोदी पेढे वाला आहे, पण आता पेढे वाला नाही का? पंधरा लाख दिले नाहीत, नोटाबंदी ने उद्योग बंद पडले, हे सगळे तुम्ही विसरून गेलात का? दिलेली वचने तुम्ही न पाळून लाखो लाखो जनतेला फसवले आहे.
ही शोभणारी गोष्ट नाही जनता तुम्हाला शिक्षा करेल” अशा शब्दात श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक धरणग्रस्तांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे .
विधानसभा आणि सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने श्रमिक मुक्ती दलाची भूमिका जाहीर करण्यासाठी डॉ पाटणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. उदयनराजेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सडकून टीका केली.डॉ पाटणकर म्हणाले, आमच्या संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील उमेदवारांसाठी दहा मुद्द्यांवर पाठिंबा दर्शविला निर्णय घेतला आहे.
भाजपा शिवसेना पक्ष हुकूमशाही पद्धतीचा जातिवाद, धर्मांध, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना पाठीशी घालणारी आहे. त्यामुळे आता त्यांचा पराभव करून जनतेच्या लोकशाही ची अंमलबजावणी करण्यासाठी नवे सरकार निर्माण केले पाहिजे .राज्यातील प्रत्येक कुटुंबाची शेती बारमाही बागायत करण्यासाठी समान न्यायाच्या पद्धतीने पाणी दिले पाहिजे.
त्यासाठी आटपाडी पॅटर्न सार्वत्रिक केला पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना जमिनी व त्या जमिनीला पाणी मिळेपर्यंत दरमहा पंधरा हजार रुपये निर्वाहभत्ता मिळण्यासाठी संघर्षामध्ये सहभागी झाले पाहिजे. विकास निधी, आमदार फंडातून गाव समितीच्या संमती प्रमाणे कामे करावीत .स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत श्रमिक मुक्ती दलाच्या विचाराने उमेदवाराबाबत निर्णय घ्यावा.
आंदोलनात सहभागी व्हावे .प्रचारा मधील फलकांवर श्रमिक मुक्ती दलाचे नाव अध्यक्ष यांचे छायाचित्र प्रसिद्ध करावे. निवडून आल्यानंतर भाजप-शिवसेनेत जाऊ नये आदी दहा मुद्द्यांवर सहमती दर्शवतील त्यांच्या पाठीशी आम्ही राहू.
श्रीनिवास पाटील यांनीही ते मान्य केल्यास त्यांच्या त्यांच्यासाठी मेळावे घेऊ. दहा ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत अशी भूमिका डॉ पाटणकर यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ प्रशांत पन्हाळकर ,राज्य कार्यकारणी सदस्य संपत देसाई, जयंत निकम ,दिलीप पाटील, जयवंत निकम,चैतन्य दळवी, मालोजी पाटणकर, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.