सावरगाव घाट येथील पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या स्वागतासाठी 370 तोफांची सलामी देण्यात आली. शहा यांनी मेळाव्यातील भाषणावेळी कलम 370 तसेच मोदींनी ओबीसींना घटनात्मक दर्जा दिल्याचा उल्लेख करत सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
विजया दशमी हे शुभाचा अशुभावरचा विजय आहे. तसेच तुम्ही पंतप्रधानांच काम घराघरात पोहोचवा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास करत आहे. मला राजकीय गोष्टी करायच्या नाहीत, पण हा भगवान बाबांचा आशीर्वाद आहे की मी लोकसभा निवडणुकांनंतर पहिलं भाषण तुम्हा लोकांसमोर देत आहे.
नरेंद्र मोदी यांनी गेल्या 70 वर्षं रखडलेल्या गोष्टी मोदींनी पूर्ण केल्या. तसेच त्यांनी ओबीसींना संवैधानिक मान्यता दिली. जेव्हापासून मोदी सरकार आलं तेव्हापासून वंचितांसाठी अनेक कामं आम्ही केली.
कलम 370 हटवून संपूर्ण देशाला राष्ट्रभक्तीने एकत्र आणण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जे 370 हटवण्याचा विरोध करतात, त्यांना तुम्ही का असं विचारणार का? कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग आहे, त्याला जोडण्याचं काम मोदींनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी पाच महिन्यात 370 हटवलं.
तुम्ही सर्वांनी नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद दिलात, 300 सीट्स दिल्या आता पंकजाही ते काम पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. ऊस कामगारांसाठी गोपिनाथ यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं होतं. मला खात्री आहे की पंकजाही त्याच मार्गाने पुढे जात आहे. गोपिनाथ मुंडे यांनी भगवान बाबांच्या मार्गावर चालत खूप चांगलं काम केलं.
शिक्षणाच्या माध्यमातूनच वंचिताचा विकास होऊ शकतो, ही भगवान बाबांची शिकवण आहे. मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला नवीन दिशा दिली. पाच वर्षांपूर्वी या स्मृतिस्थळाची घोषणा पंकजा यांनीच केली होती. भगवान बाबांनी त्यांचं आयुष्य वंचितांसाठी खर्च केलं. त्यांचे स्मृतिस्थळ पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल.